6 Cricketers Who Played For Another Countries: जन्मले एका देशात पण खेळले दुसऱ्या देशासाठी; हे 6 क्रिकेटर कोण आहेत? घ्या जाणून

या यादीत केविन पीटरसन आणि इमरान ताहिर यांसारख्या दिग्गज खेळांडूचाही समावेश आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

क्रिकेट (Cricket) खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलाला स्वत:च्या देशाकडून खेळायचे असते. प्रत्येकजण नेहमीच आपल्या देशाची जर्सी घालण्याचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, किक्रेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या देशाकडून खेळण्याची संधी मिळतेच, असे होत नाही. यामुळे अनेक खेळाडू इतर देशाचे प्रतिनिधित्व करताना आपणांस दिसतात. तर, एका देशात जन्मलेले परंतु दुसर्‍या देशासाठी खेळलेल्या 6 क्रिकेटरांची माहीती जाणून घेऊया. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीत केविन पीटरसन आणि इमरान ताहिर यांसारख्या खेळांडूचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही खेळाडू इतर देशांकडून खेळतात. यामागे अनेक कारणे असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी म्हणून काही खेळाडू आपला देश बदलतात. तर, काही खेळाडूंना बॉर्डरच्या समस्येमुळे त्यांना क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाही. तसेच दुसऱ्या देशात आपल्याला चांगली संधी मिळेल, यामुळेही काहीजण इतर देशांचे प्रतिनिधित्व करण्याचे ठरवतात. हे देखील वाचा- ICC Awards 2020: आयसीसीचे वार्षिक पुरस्कार घोषित; विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटर, एमएस धोनी 'या' पुरस्काराचा मानकरी

ख्रिस जॉर्डन-

टी-20 स्पेशलिस्ट ख्रिस जॉर्डन याचा जन्म वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथे झाला आहे. परंतु, तो इंग्लंडकडून खेळताना दिसत आहे. स्पोर्ट्स स्कॉलरशिप मिळाल्यावर जॉर्डन इंग्लंडला गेला. दरम्यान, 2013 मध्ये ससेक्ससाठी चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्याला इंग्लंड लायन्ससाठी त्याला संधी मिळू लागली. अखेर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात त्याने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून त्याला ओळखले जात आहे.

जेसन रॉय-

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून फलंदाजी सुरू करणारा जेसन रॉय यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन येथे झाला. जेसन हा दहा वर्षाचा असताना आपल्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये आला होता. त्यानंतर तो इंग्लंमध्येच राहिला. दरम्यान, व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो सरेकडून खेळत असताना त्याने चांगली कामगिरी बजावली होती. ज्यामुळे इंग्लंडच्या संघात त्याला संधी देण्यात आली होती.

जोफ्रा आर्चर-

जोफ्रा आर्चरची कथा ख्रिस जॉर्डनसारखीच आहे. तो वेस्ट इंडीजच्या बार्बाडोस भागाचा आहे. जोफ्रा हा वेस्ट इंडिजच्या संघाकडून अंडर-19 खेळला होता. मात्र, त्याला वेस्ट इंडिजच्या संघात संधी मिळालेली नाही. त्यानंतर जॉर्डनने आर्चरची इंग्लडच्या बोर्डाकडे शिफारस केली. ज्यामुळे त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, बीबीएलमध्ये हॉर्च हरिकेन्सकडून खेळताना आर्चरने सर्वोकृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला इंग्लंडच्या संघात संधी देण्यात आली. त्यावेळी त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. याच कामगिरी जोरावर त्याला मागील एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यास संधी मिळाली. या विश्वचषकाच्या अंतिम षटकात गोलंदाजी करत त्याने इंग्लंडच्या संघाला विजय मिळून दिला आहे.

केविन पीटरसन-

सर्वात प्रसिद्ध इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन हा दक्षिण आफ्रिकेचा आहे. ऑफ स्पिनर म्हणून त्याने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. त्यावेळी तो थोडी फलंदाजी करायचा. परंतु, जेव्हा तो इंग्लंडला गेला तेव्हा त्याने आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित केले. दरम्यान, 2005 मध्ये त्याने इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यास पात्र ठरला. त्यानंतर पीटरसनने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेतच खेळला. त्यावेळी त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती.

इमरान ताहिर-

दक्षिण आफ्रिकेसाठी क्रिकेट खेळणारा अनुभवी लेगस्पिनर पाकिस्तानचा आहे. त्यांचा जन्म लाहोरमध्ये झाला आणि तेथे त्याने काही काळ क्रिकेट खेळला. खरं तर, त्याने अंडर-19 संघात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. तो पाकिस्तान 'अ' संघाचा भाग होता. मात्र, राष्ट्रीय संघात संधी मिळाली नाही. दरम्यान, ताहिर इंग्लंडला गेला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत गेला. त्याला 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यासाठी निवडले गेले होते. परंतु, तो पात्र नसल्यामुळे खेळू शकला नव्हता. यासाठी त्याला 2011 पर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागली होती.

बेन स्टोक्स-

सर्वात प्रसिद्ध इंग्रजी खेळाडूचा जन्म इंग्लंडमध्ये नव्हे तर, न्यूझीलंडमध्ये झाला होता. वडिलांना पाहण्यासाठी न्यूझीलंडला जावे लागले म्हणून, पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या काही कसोटी सामन्यांमध्ये तो मुकला होता. स्टोक्सने वयाच्या 18 व्या वर्षी डरहॅमबरोबर करार केला होता. मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने न्यूझीलंडविरुद्ध आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.



संबंधित बातम्या

New Zealand Beat Sri Lanka, 1st ODI Match 2025 Full Highlights: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव करून मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी; पहा NZ vs SL सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स येथे

New Zeland Beat Sri Lanka 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 9 गडी राखून केला पराभव, विल यंगची 95 धावांची मॅच विनिंग खेळी; वाचा सामन्याचे स्कोअरकार्ड

SL vs NZ 1st ODI 2025 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा डाव 178 धावांवर गारद, मॅट हेन्रीने न्यूझीलंडसाठी केली घातक गोलंदाजी; पाहा स्कोरकार्ड

New Zealand vs Sri Lanka, ODI Stats: पाहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी