IPL 2022 Mega Auction: आयपीएलच्या महा लिलावापूर्वी फ्रँचायझींना ‘या’ 5 चुका पडू शकतात महागात
पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या मोसमासाठी महा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या सर्व संघांनी आधीच मेगा स्पर्धेची तयारी सुरु केली असावी. पण फ्रँचायझी कितीही तयारीनिशी आले तरीही ते मेगा लिलावात नेहमीच काही गडबड करतात. आज आपण आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी 5 असे निर्णय जे फ्रँचायझींनी घेऊ नये याबद्दल जाणून घेणार आहोत.
IPL 2022 Mega Auction: पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15व्या मोसमासाठी महा लिलाव आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या (IPL) सर्व संघांनी आधीच मेगा स्पर्धेची तयारी सुरु केली असावी. पण फ्रँचायझी कितीही तयारीनिशी आले तरीही ते मेगा लिलावात नेहमीच काही गडबड करतात. अगदी छोट्या-छोट्या चुका देखील दीर्घकाळापर्यंत संघासाठी त्रासदायक ठरतात, कारण मेगा ऑडिशनमध्ये निवडलेला संघ पुढील दोन ते तीन हंगामात मुख्य भूमिका बजावतात. त्यामुळे, संघांनी मेगा लिलावापूर्वी चुकीचे निर्णय घेणे टाळावे. 2022 मधील आगामी मेगा लिलावापूर्वी विविध फ्रँचायझींकडून बरेच मोठे निर्णय अपेक्षित आहेत. काही विवादास्पद असू शकतात, तर काही मास्टरस्ट्रोक ठरू शकतात. या लेखात, आज आपण आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी 5 असे निर्णय जे फ्रँचायझींनी घेऊ नये याबद्दल जाणून घेणार आहोत. (IPL 2021: रिषभ पंतचे कर्णधारपद धोक्यात? दिल्ली कॅपिटल्स संघात कमबॅकवर श्रेयस अय्यरने सोडले मौन)
1. क्रुणाल पांड्यासाठी राईट टू मॅच कार्ड
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) लीगमधील सर्वात हुशार फ्रँचायझी आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यांचे निर्णय क्वचितच परतफेड करतात आणि काहीही झाले तरीही ते नेहमीच योग्य ठरतात. तथापि, आगामी मेगा लिलावात एक चूक मुंबईने करू नये ती म्हणजे राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड वापरणे आणि क्रुणाल पांड्याला (Krunal Pandya) संघात कायम ठेवणे. क्रुणाल गेल्या अनेक हंगामात प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला असून तो बॅटबरोबरच चेंडूशी विसंगत आहे. मुंबईने 2018 मध्ये कृणालसाठी राईट टू मॅच कार्ड वापरलेला होता पण तो मुंबई संघ व्यवस्थापनाने दर्शवलेल्या विश्वासाची परतफेड करण्यास सक्षम ठरला नाही.
2. आरसीबीने आणखी एक महागडा परदेशी फलंदाजाला खरेदी करणे
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) मेगा लिलावातील इतिहास खरोखर चांगला नाही. आरसीबीची चांगलीच परदेशातील वेगवान गोलंदाज घेण्याऐवजी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सबरोबर जाण्यासाठी दुसर्या मोठ्या व महागड्या परदेशी फलंदाजाला खरेदी करण्याची वाईट सवय आहे. 2022 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावातून निवडण्यासाठी परदेशी वेगवान गोलंदाजांमध्ये बरेच चांगले पर्याय असतील. त्यांच्याकडे सध्या ग्लेन मॅक्सवेल आहे त्यामुळे आरसीबीने (RCB) पूर्वीच्या त्यांच्या चुका पुन्हा करु नयेत आणि एक चांगला परदेशी वेगवान गोलंदाज मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
3. पंजाबची संघ बांधणी
पंजाब किंग्ज (Punjab Kings) प्रत्येक मेगा लिलावात संपूर्ण दुरुस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. ते सहसा त्यांचे बरेचसे खेळाडू कायम ठेवत नाहीत आणि नवीन खेळाडू विकत घेतात. हे त्यांच्यासाठी नेहमी बॅकफायर होते. 2018 मधील शेवटच्या मेगा लिलावात जवळपास प्रत्येक खेळाडूंसाठी पंजाबने बोली लावली होती. यावेळी मात्र पंजाबमध्ये खेळाडूंचा चांगला गाभा आहे.त्यांनी केएल राहुल (KL Rahul), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि मोहम्मद शमी यासारख्या खेळाडूंना रिटेन केले पाहिजे आणि निकोलस पूरन सारख्या एखाद्यासाठी आरटीएम वापरण्याची शक्यता आहे. म्हणूनच, पंजाबने 2022 मध्ये मेगा लिलावात संपूर्ण दुरुस्ती करणे टाळले पाहिजे.
4. दिल्लीकडून शिखर धवनची हकालपट्टी
जेव्हापासून त्यांनी आपले नाव दिल्ली डेअरडेव्हिल्सवरून (डीडी) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) केले आहे तेव्हापासून त्यांनी क्वचितच चुकीचे निर्णय घेतले आहेत. तथापि, जर त्यांनी 2022 मध्ये झालेल्या मेगा लिलावात स्टार सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhawan) कायम ठेवले नाही तर हा निर्णय नक्कीच वाईट ठरेल. धवन आतापर्यंत खेळलेल्या सर्व मोसमात दिल्लीचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे आणि गेल्या काही हंगामात त्याने स्वत:ला एक योग्य टी-20 मॅच-विनरच्या रूपात रूपांतरित केले. दिल्लीकडे मेगा लिलावापूर्वी कायम ठेवसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु धवनला सर्वात वाईट परिस्थितीत परत आणण्यासाठी ते सहजपणे त्यांच्या आरटीएमचा वापरू शकतात.
5. सनरायझर्स हैदराबादचा डेविड वॉर्नर गुड-बाय
डेविड वॉर्नर (David Warner) लीगच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याच्या नेतृत्वात पहिले विजेतेपद पटकावले होते आणि अनेक वर्षांपासून तो फ्रँचायझीकडून खेळत आहे. पण तो आता त्यांचा कर्णधार राहिलेला नाही. याचा अर्थ असा की वॉर्नर यापुढे ऑरेंज आर्मीसाठी स्वयंचलित निवड नाही. वॉर्नरला मेगा लिलावात कायम न ठेवणे ही गंभीर चूक सिद्ध होऊ शकते. वॉर्नरने सनरायझर्ससाठी अनेक सामने एकहाती जिंकले आहेत आणि असे करणे तो सुरूच ठेवू शकतो. 2022 मध्ये आगामी मेगा लिलावासाठी हैदराबादने वॉर्नरची साथ सोडणे चुकीचा निर्णय ठरू शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)