IND vs NZ, 1st T20 Weather Report: भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता, वेलिंग्टनमधून आली निराशाजनक बातमी

न्यूझीलंड दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करत आहे तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

भारत आणि न्यूझीलंडचे (IND vs NZ) संघ टी-20 विश्वचषकानंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ नव्याने सुरुवात करण्याच्या विचारात आहेत. दोन्ही संघांमध्ये 18 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करत आहे तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत युवा खेळाडूंना या दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या दरम्यान, टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी वेलिंग्टनमधून एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. (IND vs NZ, 1st T20 Weather Report)

खरं तर, न्यूझीलंडच्या हवामान अंदाजानुसार, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पाऊस पडू शकतो. अहवालानुसार, दुपारी आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ढगाळ वातावरणही राहण्याची शक्यता आहे. याशिवाय येथे जोरदार वाऱ्यासह तापमान 14 अंशांपर्यंत पोहोचू शकते. (हे देखील वाचा: IND vs NZ T20I Head to Head: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय युवा संघ उतरणार मैदानात, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी)

मात्र, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाल्यास येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. टीम इंडिया चौथ्यांदा स्टेडियमवर खेळणार आहे, पण त्याआधी त्यांना दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते तर एक सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.

भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक