TATA IPL 2025 Mega Auction Day 2: 173 कोटी... 132 स्लॉट, दुसऱ्या दिवशीही लागणार मोठी बोली; जाणून घ्या कोणाकडे आहे सर्वाधिक पैसा?

TATA IPL 2025 Mega Auction: पहिल्या दिवशी सर्वच फ्रँचायझींनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दुसऱ्या दिवशी सर्व 10 फ्रँचायझींकडे किती पैसे आणि किती आरटीएम शिल्लक आहेत?

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: 173 कोटी... 132 स्लॉट, दुसऱ्या दिवशीही लागणार मोठी बोली; जाणून घ्या कोणाकडे आहे सर्वाधिक पैसा?
IPL Mega Auction (photo Credit - X)

TATA IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. ऋषभ पंतने सर्व विक्रम मोडले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. याशिवाय श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. पहिल्या दिवशी 72 खेळाडूंवर 467.95 कोटी रुपये खर्च झाले. 72 खेळाडूंपैकी तीन खेळाडूंना 20 कोटींहून अधिक रक्कम मिळाली. पहिल्या दिवशी सर्वच फ्रँचायझींनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. त्यानंतर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दुसऱ्या दिवशी सर्व 10 फ्रँचायझींकडे किती पैसे आणि किती आरटीएम शिल्लक आहेत? (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाचा लिलाव किती वाजता होणार सुरू? 493 खेळाडूंवर लावली जाणार बोली)

सर्व संघांकडे दुसऱ्या दिवसासाठी किती पैसे आहे शिल्लक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- 30.65 कोटी रुपये RTM-3

मुंबई इंडियन्स- 26.10 कोटी रुपये RTM

पंजाब किंग्स- 22.50 कोटी रुपये RTM-3

गुजरात टायटन्स- 17.50 कोटी रुपये RTM-1

राजस्थान रॉयल्स- 17.35 कोटी रुपये RTM-0

चेन्नई सुपर किंग्ज- 15.60 कोटी रुपये RTM-0

लखनौ सुपर जायंट्स- 14.85 कोटी रुपये RTM-1

दिल्ली कॅपिटल्स- 13.80 कोटी रुपये RTM-1

कोलकाता नाईट रायडर्स- 10.05 कोटी रुपये RTM-0

सनरायझर्स हैदराबाद- 5.15 कोटी रुपये RTM-1

कोणत्या संघाकडे किती स्लॉट शिल्लक आहेत?

चेन्नई सुपर किंग्ज- 12 स्लॉट

दिल्ली कॅपिटल्स- 12 स्लॉट

गुजरात टायटन्स- 14 स्लॉट

कोलकाता नाइट रायडर्स- 12 स्लॉट

लखनौ सुपर जायंट्स- 12 स्लॉट

मुंबई इंडियन्स- 09 स्लॉट

पंजाब किंग्स- 12 स्लॉट

राजस्थान रॉयल्स- 11 स्लॉट

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- 09 स्लॉट

सनरायझर्स हैदराबाद 13 स्लॉट

ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू 

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार ऋषभ पंत आता लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झाला आहे. मेगा लिलावापूर्वी पंतबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते की, यावेळी हा खेळाडू लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडेल आणि असेच काहीसे मेगा लिलावात पाहायला मिळाले. पंत आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ज्याला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींना खरेदी केले. आता पंत आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

केएल राहुल दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील 

लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल आता दिल्ली कॅपिटल्समध्ये पोहोचला आहे. यावेळी राहुल दिल्लीचे कर्णधारपद भूषवताना दिसतो. केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. केएल राहुलला खरेदी करण्यात आरसीबीनेही रस दाखवला होता, पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2024 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).