ICC World Test Championship: डब्ल्यूटीसीच्या इतिहासात 'या' कर्णधारांना आजपर्यंत एकही जिंकता आला नाही सामना, यादीत एका भारतीय कर्णधाराचाही समावेश

अनेक कर्णधारांनी आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) मध्ये नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे, परंतु असे काही कर्णधार आहेत ज्यांना आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही.

Pic Credit - PCB

ICC World Test Championship: अनेक कर्णधारांनी आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) मध्ये नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे, परंतु असे काही कर्णधार आहेत ज्यांना आतापर्यंत एकही सामना जिंकता आला नाही. या कर्णधारांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले असतील, पण नशीब आणि संघाची कामगिरी त्यांच्या बाजूने नव्हती. या यादीत एका भारतीय कर्णधाराचे नाव देखील समाविष्ट आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS कसोटी मालिकेपूर्वी भारताला बसू शकतो मोठा धक्का, कर्णधार Rohit Sharma होऊ शकतो बाहेर)

शान मसूद (पाकिस्तान)

शान मसूद हा पाकिस्तानचा एक प्रतिभावान सलामीवीर फलंदाज आहे. संघाचे नेतृत्व करताना त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते. डब्ल्यूटीसीमध्ये पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवले, त्यापैकी सर्व सामन्यात त्याला पराभवाला स्वीकारावे लागले आहे.

शाकिब अल हसन (बांगलादेश)

शाकिब अल हसन हा बांगलादेशचा अनुभवी आणि जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, त्याची डब्ल्यूटीसीमधील कर्णधारपदाची कारकीर्द चांगली नव्हती. त्याने चार सामन्यांत बांगलादेश संघाचे कर्णधारपद भूषवले होते, मात्र सर्व सामन्यांमध्ये त्याचा संघ हरला होता.

नाईल ब्रँड (दक्षिण आफ्रिका)

नील ब्रँड हा दक्षिण आफ्रिकेचा कमी अनुभवी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले तेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिका ब संघाचे नेतृत्व केले. या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

दिनेश चंडिमल (श्रीलंका)

दिनेश चंडिमल हा श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू असून काही वेळा संघाचा कर्णधार असतो. डब्ल्यूटीसीमध्ये दोन सामन्यांमध्ये त्याने श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व केले, परंतु श्रीलंकेला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)

मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टिरक्षक आहे. पण डब्ल्यूटीसीच्या दोन सामन्यांसाठी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले तेव्हा दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

जसप्रीत बुमराह (भारत)

जसप्रीत बुमराह हा भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. 2022 च्या कसोटी सामन्यात त्याने प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते, परंतु इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.



संबंधित बातम्या