COVID-19 चा धोका लक्षात घेत मायदेशी परतलेला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकी संघ सेल्फ-आयसोलेशनमध्ये
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाच्या सदस्यांना 14 दिवसांच्या कालावधीत सेल्फ-आयसोलेशन आणि अंतर बनवून देण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडला (New Zealand) परतलेल्या संघाला 14 दिवस सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (BlackCaps) गुरुवारी या वृत्ताची पुष्टी केली. बोर्डाच्या अधिकृत निवेदनानुसार, गेल्या आठवड्यात सिडनीहून परत आलेल्या सर्व 15 खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांना त्यांच्या घरीच रहावे लागेल. न्यूझीलंडची पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी 18 मार्च रोजी दिलेल्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे पब्लिक अफेयर्स मॅनेजर रिचर्ड ब्रूक म्हणाले की, "ते (खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी) सर्वजण आयसोलेशनमध्ये गेले आहेत. आम्ही त्यांना सेल्फ आयसोलेशन संबंधित सर्व माहिती पुरविली आहे आणि आपल्या माहितीनुसार ते या नियमांचे काटेकोरपणे अनुसरण करीत आहेत." (Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसशी लढण्याची 'टेस्ट क्रिकेट' पद्धत... सचिन तेंडुलकर ने सांगितलं साथीच्या रोगाला पराभूत करण्याचे टिप्स)
कोरोना व्हायरसचा वाढत प्रभाव पाहता चॅपेल-हॅडली ट्रॉफी वनडे मालिका पुढील सूचना होईपर्यंत पुढे ढकलल्यानंतर किवी संघ ऑस्ट्रेलिया सोडून त्वरित मायदेशी रवाना झाला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघाच्या (South Africa) सदस्यांना 14 दिवसांच्या कालावधीत सेल्फ-आयसोलेशन आणि अंतर बनवून देण्यास सांगण्यात आले आहे. बुधवारी भारत दौर्यावरील मालिकेतील एकही सामना न खेळता हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेत परतले. कोरोना व्हायरसवर अद्याप योग्य लसीकरण उपलब्ध नसल्यामुळे हा व्हायरस जगभरात मोठ्या प्रमाणात पसरला जात आहे. बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने समन्वयाने निर्णय घेत मालिका स्थगित केली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुएब मांजरा यांनी म्हटले आहे की, मंडळाने या दौऱ्यापूर्वी जोखीम व्यवस्थापन आयोजित केले होते. त्यानंतर, खेळाडूंना कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता बरीच कमी आहे. खेळाडू त्यांच्या दौर्यावर असताना जगाचे वातावरण पटकन बदलले याची त्यांना चांगली जाणीव होती.
दरम्यान, सध्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 जणांवर पोहचला आहे. सध्या देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 150 च्या वर जाऊन पोहचली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण होऊन 7 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.