Coronavirus Outbreak: शाहिद अफरीदी ने पाकिस्तानमधील 2000 कुटुंबांना पुरवले रेशन; Netizens ने विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांना फटकारले

पाकिस्तानमध्ये आजवर कोरोना व्हायरसचे 900 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. भारताचे अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी यांना फटकारले आणि आपल्या देशातील लोकांसाठी दान करण्यास सांगितले.

शाहिद आफ्रिदी (Photo Credit: IANS)

संपूर्ण जग संकटात सापडले आहे, जगातील अनेक देशांमध्ये व्यवसाय बंद आहेत आणि आंशिक/पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आहेत, ज्यामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकं अत्यंत दबावाखाली आले आहेत. मूलभूत गरजा आवश्यक असणाऱ्या मदत करण्यासाठी सरकार आणि समाज कल्याण अधिकारी आवश्यक ती पावले उचलू पाहत असले तरी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद अफरीदीने (Shahid Afridi) आपल्या देशातील 2,000 कुटुंबांमध्ये रेशन वाटप केले. पाकिस्तानमध्ये आजवर कोरोना व्हायरसचे 900 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल 7 जण साथीच्या आजाराचे बळी पडले आहेत. अफरीदी मागील काही दिवसांपासून देशातील गरीब आणि गरजूंना मदत करीत आहे. आफ्रिदी यांनी पाकिस्तानात (Pakistan) लोकांना जंतुनाशक साबण, साहित्य आणि अन्न दान केले आणि कोविड-19 (COVID-19) पासून स्वत: चा बचाव करण्याच्या उपायांवर त्यांना प्रशिक्षण दिलं. (Cornavirus: पाकिस्तान मध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 900 च्या पार, पॅसेंजर ट्रेन रद्द)

या कठीण काळात देशातील गरजू लोकांना मदत पुरवण्यासाठी सोशल मीडियावर यूजर्सने अफरीदीचे कौतुक केले. शिवाय, भारताचे अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी यांना फटकारले आणि आपल्या देशातील लोकांसाठी दान करण्यास सांगितले. अफरीदीने ट्विटरवर लिहिले की, "कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या कीटकनाशक साबण, उपशामक पदार्थ, अन्न आणि अवलंब करण्याच्या पद्धतींबद्दल गरजू लोकांना पत्रक देण्याचा आज तिसरा दिवस होता. लोकांना घरीच राहण्याचा सल्लाही दिला. प्रत्येकाने एकत्र काम करा आणि इतरांनाही मदत करा." 'शाहिद आफ्रिदी फाउंडेशन' च्या माध्यमातून पाकिस्तानचा माजी कर्णधार गरजूंना मदतीसाठी पुढाकार घेतला.

आफ्रिदीच्या या पोस्टने सोशल मीडिया यूजर्सचे मन जिंकले आणि त्यांनी त्याचे कौतुक केले. सोबतच भारतीय क्रिकेटपटूंना फाटकारही लगावली.

भारतातील मोठे क्रिकेटर प्लेट आणि घंटी वाजवत आहेत

सचिन, सौरव, विराट, धोनी, आता लज्जित व्हा

भारतीय क्रिकेटपटू तमाशा पाहत आहेत

आफ्रिदीपेक्षा 10 पटीने श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू

21 दिवसांच्या कर्फ्यूमुळे उपासमारीला समोरे जाणाऱ्यांसाठी भारतीय क्रिकेटपटूही काहीतरी करावे

अफरीदी आमच्या राष्ट्रासाठी अल्लाहचा आशीर्वाद आहे

दुसरीकडे, पाकिस्तानमधेही कोरोना रुग्णांची संख्याही वाढत जात आहे. पाकिस्तानमध्ये 900 पेक्षा अधिक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आलं आहे.