Sachin Tendulkar Lookalike Balvir Chand: सचिन तेंडुलकरच्या डुप्लिकेटला बसला कोरोनाचा फटका; नौकरी गमावली, कोविड-19 ने होते संक्रमित
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा डुप्लिकेट अशी ख्याती म्हणून ओळखल्या जाणार्या बलवीर चंदला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे आणि यामुळे त्याला आर्थिक संकटाने घेरले आहे. आणि सर्वात वाईट बाब म्हणजे त्याला आणि कुटुंबातील तीन सदस्यांनाही संसर्ग झाला होता.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) डुप्लिकेट अशी ख्याती म्हणून ओळखल्या जाणार्या बलवीर चंदला (Balvir Chand) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका बसला आहे आणि यामुळे त्याला आर्थिक संकटाने घेरले आहे. आणि सर्वात वाईट बाब म्हणजे त्याला आणि कुटुंबातील तीन सदस्यांनाही संसर्ग झाला होता. सचिनचा डुप्लिकेट (Sachin's Lookalike) म्हणून बलवीरला चांगली प्रसिद्धी मिळाली शिवाय, त्याने अनेक जाहिरातींमध्ये सचिनचा डुप्लिकेट म्हणून काम केले. इतकेच नाही तर मुंबईतील एका फूड चेनने त्याला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ठेवले होते. हिंदुस्थान टाइम्सच्या एका अहवालानुसार, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) चंदला आपली नोकरी गमवावी लागली. 21 जून रोजी, पंजाबमधील शहलोन गावातील डॉक्टरांनी 50 वर्षीय बलवीर चंदला सांगितले की तो आता आयसोलेशन वॉर्ड सोडू शकतात, असं त्यांच्या सोबत पत्नी, मुलगी आणि मुलासोबत कोरोना पॉसिटीव्ह आढल्याच्या 11 दिवसानंतर घडले." असंख्य परप्रांतीप्रमाणेच नोकरी गमावल्यानंतर चंदला आपल्या गावी परतावे लागले. (ब्रायन लारा याच्या मुलाची फलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरला आली स्वतःच्या बालपणाची आठवण, शेअर केली खास पोस्ट)
चंद 90 हून अधिक शहरांमध्ये 350 आउटलेट्स असलेली वांशिक फास्ट फूड चेन - गोली वडा पाव या ब्रँड अॅम्बेसेडर होते आणि मुंबईच्या विक्रोळी उपनगरात भाड्याने फ्लॅटमध्ये राहण्यासाठी पुरेसे पैसे कमवायचे. तेंडुलकरचा डुप्लिकेट म्हणून 22 वर्षांपर्यंत चंदची उपजीविका सुरु राहिली. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना चंद म्हणाला, “लॉकडाऊननंतर त्यांनी व्यवसाय गमावला आणि बर्याच कर्मचार्यांना काढून टाकले. मलाही जाण्यासाठी सांगितले गेले; ते म्हणाले की जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा ते मला परत बोलावतील."
भाडे भरणे अवघड झाले आणि जेव्हा आंतरराज्य प्रवास पुन्हा सुरू झाला तेव्हा चंद, त्यांची पत्नी आणि तीन मुलं त्यांच्या गावी परतण्यासाठी एक ट्रेननी प्रवास केला. पश्चीम एक्स्प्रेसने मुंबई ते लुधियाना प्रवास करताना ते कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले. “आम्ही सर्व खबरदारी घेतल्या, 15 बाटल्या सॅनिटायझर्स, N95 मास्क, आमचे स्वतःचे खाद्य. पण बरेचसे प्रवासी निष्काळजीपणे वागत होते. मी अनुभवातून म्हणेन की सध्या प्रवास सुरक्षित नाही." चंदला त्याच्या आणि सचिनमध्ये साम्यबाबत 1989 यामध्ये समजले जेव्हा 16 वर्षीय तेंडुलकरने भारतासाठी डेब्यू केले. सचिनला पहिल्यानंतर त्यानेही त्याच्यासारखी हेअरस्टाईल केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)