Alyssa Healy Breaks MS Dhoni's Record: ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली ठरली एमएस धोनीच्या वरचढ, बनली सर्वात यशस्वी टी-20 विकेटकीपर
हिली क्रिकेटच्या सर्वत छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक डिसमिसल्स करणारी विकेटकीपर ठरली. धोनीने टी-20मध्ये 91 डिसमिसल्स केल्या, तर हिलीने 92 डिसमिसल्स केल्या आहेत.
Most Dismissals by Wicketkeeper: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीमची (Australia Women's Cricket Team) विकेटकीपर एलिसा हीलीने (Alyssa Healy) आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात विकेटकीपरने सर्वाधिक बाद केलेल्या एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे. हिली माजी भारतीय वर्ल्ड कप विजेता कर्णधार धोनीच्या वरचढ राहिली आणि क्रिकेटच्या सर्वत छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक डिसमिसल्स करणारी विकेटकीपर ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने टी-20मध्ये 91 डिसमिसल्स केल्या आहेत. तर रविवारी ब्रिस्बेनमधील (Brisbane) एलन बॉर्डर फील्ड मधील ऑस्ट्रेलिया महिला (Australia Women) आणि न्यूझीलंडच्या महिला (New Zealand Women) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला मागे टाकत 92 डिसमिसल्स केल्या. धोनीने 98 सामन्यांत 57 कॅच आणि 34 स्टंपिंग्जसह हा विक्रम नोंदवला होता. धोनीने 15 ऑगस्ट रोजी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आणि सध्या तो इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जकडून युएईमध्ये खेळत आहे. (CSK vs DC आयपीएल सामन्यात एमएस धोनीने पुन्हा दाखवली चपळता, अफलातून कॅच घेत श्रेयस अय्यरला धाडलं माघारी Watch Video)
दुसर्या टी-20 दरम्यान स्टंपिंग आणि झेलमध्ये गुंतलेल्या हेलीने आता 114 सामन्यात 92 डिसमिसल्स केले आहेत. पहिल्या दहा यादीमध्ये भारताच्या तानिया भाटियासह महिला स्टार्सचा वर्चस्व आहे. इंग्लंडची सारा टेलर 90 सामन्यांमधून 74 डिसमिसल्ससह तिसर्या स्थानावर आहे, 75 सामन्यांत 72 डिसमिसल्ससह रेचेल प्रिस्ट या टी-20 यादीत चौथ्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडीजची माजी यष्टीरक्षक मेरीसा अगुलीराने 95 सामन्यांत 70 डिसमिसल्सने पाचवे स्थान मिळवले आहे. भारताची तानिया भाटिया देखील जास्त मागे नाही आणि तिने केवळ 50 सामन्यात 67 डिसमिसल्स केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या त्रिशा चेट्टीने 76 सामन्यांतून 64 डिसमिसल्स केले आहेत. दिनेश रामदिन 71 सामन्यांत 63 बाद आणि बांग्लादेशी विकेटकीपर मुशफिकुर रहीम 86 सामन्यांत 61 डिसमिसल्ससह त्याच्या मागे आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिल्यांच्या टी-20 सामन्याबद्दल बोलायचे तर नुकत्याच संपुष्टात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 54 धावांनी पराभूत करून टी-20 मालिका 2-0ने खिशात घातली. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 128 धावांवर रोखले, पण त्यांचे फलंदाज हे माफक आव्हान गाठण्यास असमर्थ ठरले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील या मालिकेसह कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक लागलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु झाले. टी-20 मालिकेनंतर दोन्ही टीममध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळली जाईल.