Coronavirus: कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 26/11 हिरो प्रवीण तेवतियाने निधी गोळा करण्यासाठी मॅरेथॉन पदकांचा केला लिलाव
26/11 मुंबई शहरात दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले माजी मरीन कमांडो तेवतिया यांनी कोरोनाविरूद्ध लढ्यात सरकारच्या मदतीसाठी मॅरेथॉन पदकांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. तेवतिया भारतीय नौदलाच्या मार्कोस सागरी कमांडो संघाचा एक भाग होते ज्यांनी 2008 च्या ताज हॉटेलमध्ये मुंबई हल्ल्यात यशस्वीरित्या ‘ऑपरेशन ब्लॅक टॉरनाडो’ पार पाडला.
2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) जखमी झालेले भारताची मॅरेथॉन धावपटू प्रवीण तेवतिया (Praveen Taotia) खऱ्या अर्थाने हिरोची व्याख्या सध्या करतात. माजी मरीन कमांडो तेवतिया कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढ्यात सरकारच्या मदतीसाठी मॅरेथॉन पदकांचा (Marathon Medals) लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी त्यांनी दोन लाख रुपयांची मदत दिली होती. तेवतिया भारतीय नौदलाच्या (Indian Navy) मार्कोस सागरी कमांडो संघाचा एक भाग होते ज्यांनी 2008 च्या ताज हॉटेलमध्ये मुंबई हल्ल्यात यशस्वीरित्या ‘ऑपरेशन ब्लॅक टॉरनाडो’ पार पाडला. पण तेवतिया ऑपरेशन दरम्यान गंभीर जखमी झाले आणि त्याच्या डाव्या कानात आणि त्याच्या छातीच्या उजव्या भागावर गंभीर दुखापत झाल्यानंतर ते नौदलातून निवृत्त झाले. परंतु, हे सर्व त्यांच्या धावण्याच्या आत्मविश्वासाला मात देऊ शकले नाही आणि नेव्हीमधून निवृत्त झाल्यावर माजी कमांडोने मॅरेथॉनमध्ये प्रवेश केला. त्यांनी आजवर अनेक पदकं आणि प्रशंसा मिळवली आहे, पण कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत आपले योगदान देण्यासाठी निधी जमा करण्यासाठी आणि आपल्या पादकांचा लिलाव करण्यासाठी सध्यातेवतिया यांचं कौतुक केलं जात आहे. (Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; एका क्लिकवर)
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतनिधीसाठी योगदान मागितल्यानंतर मी माझी 40 पदकं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लिलाव करण्याचे ठरविले, ”असे तेवतिया यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “मी यापूर्वी माझी दोन पदकं विकली आहे आणि मला 2 लाखांची रक्कम मिळाली आहे. ते पीएम-केअर्स मदत निधीमध्ये जमा केले गेले आहे.”
कोविड-19 विरुद्ध लढाईत तेवतिया पदकांची केला लिलाव
तेवतिया यांची लिम्का बुक रेकॉर्डमधेही नोंद झाली आहे. ते म्हणाले की, 2008 च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याने आपल्या छातीत घेतलेल्या चार गोळ्यांतून सावरल्यानंतर त्याने ही पदकं अश्रू आणि वेदनांनी मिळवले होते. परंतु त्यांचा लिलाव करण्यात त्याला कोणतीही अडचण नाही आणि त्याचे कार्य इतरांना त्यांच्या छोट्या मार्गाने लढ्यात योगदान देण्यास प्रेरित करेल अशी त्यांना अशा आहे. “या लढ्यात आपण सर्व एकत्र आहोतमाझा विश्वास आहे. आपण या क्षणी एकमेकांवर टीका करू नये आणि एकमेकांच्या सोबत उभे राहू, ”असे ते राष्ट्रीय दैनिकाला म्हणाले.
सध्या ते उत्तर प्रदेशात आपल्या कुटूंबियांसमवेत राहतात आणि मुंबई हल्ल्यात त्याला गोळ्या लागल्याने त्यांना ऐकण्यात अजूनही अडचण आहे. पण त्यांनी देशाला परत देण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. “माजी सैनिक म्हणून मला नेहमीच माझ्या देशात परत देण्यास शिकवले जाते,” असे शौर्य चक्र पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या तेवतिया म्हणाले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)