पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिल्यानंतर Indus Water Treaty च्या वादात हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार, पाकिस्तानला मोठा धक्का
भारत सरकारने शेअर केलेल्या जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांच्या संदेशात म्हटले आहे की, "आपल्याकडे सुविधा देणाऱ्याच्या पलीकडे इतर कोणतीही भूमिका नाही."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये सिंधू नदीचे पाणी देखील आता भारताने बंद केले आहे. यावरून खवळलेल्या पाकिस्तानने रक्तपाताची भाषा केली होती. World Bank कडूनही या वादात हस्तक्षेप करण्यास नकार मिळाल्याने पाकिस्तान साठी हा मोठा धक्का आहे. भारत सरकारने शेअर केलेल्या जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांच्या संदेशात म्हटले आहे की, "आपल्याकडे सुविधा देणाऱ्याच्या पलीकडे इतर कोणतीही भूमिका नाही." नक्की वाचा: Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video).
World Bank President Ajay Banga on Indus Water Treaty
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)