Woman Swept Into The Open Sea: समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत खेळत होती तरुणी; अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे वाहून गेली समुद्रात, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)

ही मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर होती. दोघेही समुद्राच्या लाटांशी खेळत होते.

Woman Swept Into The Open Sea

Woman Swept Into The Open Sea: रशियातील सोची शहरात वादळादरम्यान एक तरुणी खुल्या समुद्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून, बचावकर्ते तिसऱ्या दिवशीही तिचा शोध घेत आहेत. अजूनतरी या मुलीची काहीच माहिती समजलेली नाही. मुलगी वाहून जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बीचवर होती. दोघेही समुद्राच्या लाटांशी खेळत होते. अचानक एक मोठी लाट आली, ज्यामध्ये मुलगी वाहून गेली. मुलगा कसाबसा किनाऱ्यावर परतण्यात यशस्वी झाला, मात्र तरुणी प्रवाहात लाटेसोबत आत गेली. दरम्यान, सोची हे शहर काळ्या समुद्रावर वसलेले असून, ते उन्हाळी बीच रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते. (हेही वाचा: Sambhaji Nagar Accident: रील काढताना Accelerator दाबला अन् कार थेट दरीत कोसळली, तरुणीने गमावला जीव)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)