Wearable Ultrasound System: शास्त्रज्ञांनी विकसित केली पहिली पूर्णत: घालण्यायोग्य अल्ट्रासाऊंड प्रणाली; ठेवणार रक्तदाब, हृदयाच्या कार्यांवर लक्ष

नेचर बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. अल्ट्रासोनिक सिस्टीम-ऑन-पॅच, 164 मिमी एवढ्या खोल ऊतींमधून शारीरिक सिग्नलचा सतत मागोवा घेते.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

यूएस अभियंत्यांनी पहिली पूर्णत: घालण्यायोग्य अल्ट्रासाऊंड प्रणाली विकसित केली आहे, जी आपण चालत असताना धावत असताना रक्तदाब, हृदयाच्या कार्यांवर लक्ष ठेवू शकेल. यासह ही प्रणाली वायरलेस पद्धतीने डेटा प्रसारित करू शकते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी सॅन डिएगो येथील अभियंत्यांनी विकसित केलेल्या या प्रणालीमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गोष्टींवर देखरेख ठेवणे सुलभ होणार आहे.

नेचर बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. अल्ट्रासोनिक सिस्टीम-ऑन-पॅच, 164 मिमी एवढ्या खोल ऊतींमधून शारीरिक सिग्नलचा सतत मागोवा घेते. ही प्रणाली एका वेळी 12 तासांपर्यंत रक्तदाब, हृदय गती, कार्डियाक आउटपुट आणि इतर शारीरिक सिग्नल सतत मोजण्यास सक्षम आहे. (हेही वाचा:  तरुण राहण्यासाठी सीईओ Bryan Johnson ने घेतले मुलाचे रक्त; वर्षाला स्वतःवर खर्च करत आहे 16 कोटी रुपये, जाणून घ्या कशी आहे लाइफस्टाइल)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now