Video- Helicopter Crash: फ्लोरिडाच्या पोम्पानो बीचवर फायर रेस्क्यू हेलिकॉप्टर क्रॅश; दोन जण जखमी, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)
हेलिकॉप्टर एका मजली मल्टी-युनिट इमारतीवर कोसळले.
सोमवारी सकाळी (अमेरिकन वेळेनुसार) पॉम्पानो बीचवर ब्रॉवर्ड शेरीफच्या कार्यालयाचे एक फायर रेस्क्यू हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, हेलिकॉप्टर सकाळी 8.45 च्या सुमारास नॉर्थ डिक्सी हायवे आणि पॉम्पानो बीच एअरपार्कच्या नैऋत्येस अटलांटिक बुलेव्हार्डच्या परिसरात खाली पडले. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर आकाशातून खाली पडण्यापूर्वी त्यातून धूर आणि ज्वाला निघताना दिसून येत आहे. हेलिकॉप्टर एका मजली मल्टी-युनिट इमारतीवर कोसळले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार यावेळी तीन लोक विमानात होते. पोम्पानो बीच मियामीच्या उत्तरेस 40 मैलांवर आहे. (हेही वाचा: Bomb Threat: कोचीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी, तपास सुरू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)