इस्तंबूलहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या तुर्की एअरलाइन्सच्या विमानात एक 11 वर्षाचा मुलगा बेशुद्ध पडला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. विमान बुडापेस्टमध्ये आपत्कालीन लँडिंगनंतर मुलगा मरण पावला. विमानाने बुडापेस्टमध्ये आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर मुलाला वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या मात्र मुलाला वाचवण्यात यश आले नाही. रविवारी बुडापेस्टमध्ये फ्लाइट TK003 उतरल्यानंतर विमानतळ वैद्यकीय सेवा घटनास्थळी धावल्या, परंतु तातडीने वैद्यकीय मदत देऊनही मुलाला वाचवता आले नाही. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: अमेझॉनच्या जंगलात घडला चमत्कार; कोलंबिया विमान अपघातानंतर 40 दिवसांनंतर 4 मुले जिवंत सापडली, एक फक्त 1 वर्षांचा)
An 11-year-old child died after losing consciousness on board a Turkish Airlines flight en route to New York from Istanbul, with medical services unable to resuscitate the child after the plane made an emergency landing in Budapest. The Airport Medical Service was scrambled to…
— ANI (@ANI) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)