Three-Year-Old Toddler Booked for Electricity Theft: काय सांगता? तीन वर्षांच्या मुलावर वीज चोरीचा गुन्हा दाखल; Pakistan च्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील घटना
वीज चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पुढे या मुलाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयासमोरही उभे करण्यात आले.
Electricity Theft: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी एका तीन वर्षांच्या मुलावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेशावर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी (PESCO) आणि पाणी आणि ऊर्जा विकास प्राधिकरण (WAPDA) यांच्या तक्रारींवरून, वीज चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पुढे या मुलाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयासमोरही उभे करण्यात आले. न्यायाधीशांनी या खटला फेटाळला. न्यायालयाने असेही नोंदवले की, तक्रारदार कथित गुन्ह्याशी मुलाच्या संबंधाबाबत अनिश्चित आहेत. ही घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली आहे. पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी (DISCOs) मधील वीजचोरीमुळे राष्ट्रीय तिजोरीचे पाकिस्तानी 438 अब्जांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (हेही वाचा: ब्रिटनमधील स्क्रॅप मेटल फर्मच्या भारतीय वंशाच्या संचालकाला रेल्वे ट्रॅक चोरीप्रकरणी तुरुंगवास)
पहा पोस्ट-