दिलासादायक! कोरोनाचा Omicron व्हेरिएंट 'डेल्टा'पेक्षा जास्त गंभीर नाही; अमेरिकेन शास्त्रज्ञ Fauci यांचा दावा
याआधीही, अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की ओमायक्रॉन प्रकार अधिक संसर्गजन्य आहे, परंतु डेल्टासारखा प्राणघातक नाही
अमेरिकन शास्त्रज्ञ अँथनी फाऊची यांनी म्हटले आहे की कोविड-19 चा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची तीव्रता तपासण्यासाठी काही आठवडे लागतील, परंतु सुरुवातीचे संकेत असे सूचित करतात की हा पूर्वीच्या प्रकारांपेक्षा, डेल्टापेक्षा धोकादायक नाही. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा नक्कीच डेल्टापेक्षा अधिक गंभीर नाही. ते पुढे म्हणाले, या नवीन प्रकार दक्षिण आफ्रिकेत पसरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील आणि नंतर तो उर्वरित जगामध्ये पसरेल. त्याची तीव्रता किती आहे हे पाहण्यास वेळ लागू शकतो.
याआधीही, अनेक शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की ओमायक्रॉन प्रकार अधिक संसर्गजन्य आहे, परंतु डेल्टासारखा प्राणघातक नाही. अनेक देशांमध्ये याबाबत संशोधन सुरू आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ओमायक्रॉन 38 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे, परंतु यामुळे आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)