Tesla GigaBier Beer: टेस्ला आणि ट्विटर व्यवसायानंतर आता Elon Musk विकणार दारू; बाजारात आणली बिअर, जाणून घ्या किंमत

हे तीन बाटल्यांच्या पॅकमध्ये येते. प्रत्येक बाटलीमध्ये 330 मिली बिअरचा पॅक असेल.

Elon Musk

टेस्ला या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या कंपनीने बिअर बाजारात आणली आहे. टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलने टेस्ला गिगाबियर जगासमोर सादर केला. याची किंमत £79 (रु. 8000 पेक्षा जास्त) आहे. टेस्लाच्या सायबरट्रकपासून प्रेरित असलेल्या या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण पाच टक्के आहे. हे तीन बाटल्यांच्या पॅकमध्ये येते. प्रत्येक बाटलीमध्ये 330 मिली बिअरचा पॅक असेल. सुमारे दीड वर्षापूर्वी जर्मनीतील एका कार्यक्रमादरम्यान एलॉन मस्क यांनी बिअर लॉन्च करण्याची घोषणा केली होती. जर्मनीमध्ये बनवलेले Tesla GigaBear बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि युनायटेड किंगडममध्ये खरेदी केले जाऊ शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)