टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनी घेतली पुण्यातील त्यांचा ट्विटर मित्र Pranay Pathole याची भेट

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुण्यातील त्यांचा ट्विटर मित्र, प्रणय पाथोले याची टेक्सासमधील त्यांच्या गीगा कारखान्यात भेट घेतली

Pranay Pathole (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील पुण्यातील 24 वर्षीय सॉफ्टवेअर प्रोफेशनल प्रणय पाथोळे याने दावा केला होता की, तो अनेकदा मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्याशी संवाद साधतो. त्याच्या मते त्याने एलॉन मस्क यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भविष्यात आपण त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले होते. आता टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुण्यातील त्यांचा ट्विटर मित्र, प्रणय पाथोले याची टेक्सासमधील त्यांच्या गीगा कारखान्यात भेट घेतली. सध्या या दोघांचा फोटो व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement