Singer Rahat Fateh Ali Khan Arrested in Dubai: प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला दुबईत अटक; माजी व्यवस्थापकाने दाखल केली तक्रार

राहत फतेह अली खान हे प्रसिद्ध गायक आहेत, ज्यांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आपल्या अनोख्या गायनाने त्यांनी पाकिस्तानातच नाही तर भारतात आणि जगभरात नाव कमावले आहे.

Singer Rahat Fateh Ali Khan Arrested in Dubai: प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला दुबईत अटक; माजी व्यवस्थापकाने दाखल केली तक्रार
Singer Rahat Fateh Ali Khan

Singer Rahat Fateh Ali Khan Arrested in Dubai: पाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खानला दुबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खानला दुबईतील बुर्ज दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, राहत फतेह अली खानचा माजी व्यवस्थापक सलमान अहमद याच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. सलमानने राहतविरुद्ध बदनामीची तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वी वाद झाल्याने राहतने अहमदला बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अहवालातून समोर आले आहे की, राहत हा दुबईत विविध संगीत कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी आला होता. आता राहत त्याच्या माजी व्यवस्थापकाशी सुरू असलेल्या तणावामुळे वादात सापडला आहे. सलमान अहमदने दुबई आणि इतर शहरांमध्ये खानविरोधात कायदेशीर खटले दाखल केले आहेत.

राहत फतेह अली खान हे प्रसिद्ध गायक आहेत, ज्यांचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. आपल्या अनोख्या गायनाने त्यांनी पाकिस्तानातच नाही तर भारतात आणि जगभरात नाव कमावले आहे. बॉलीवूडमध्ये त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत. (हेही वाचा: Brazilian Singer Ayres Sasaki Dies: ब्राझिलियन गायक आयरेस सासाकी यांचे लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान निधन; शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2024 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).