Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा
दरम्यान, राष्ट्रपती त्यांच्या निवासस्थानातून पळून गेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी शनिवारी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला. दरम्यान, राष्ट्रपती त्यांच्या निवासस्थानातून पळून गेले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिले होते की, 'सर्व नागरिकांच्या सुरक्षेसह सरकारचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी, सर्वपक्षीय सरकारसाठी मार्ग काढण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची शिफारस मी आज स्वीकारत आहे. हे सुलभ करण्यासाठी मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन.
Tweet