Plane Crashes Off A Runway: सेनेगलमध्ये मोठा विमान अपघात; Boeing 737 धावपट्टीवरून कोसळले, अनेकजण जखमी (Video)

सेनेगलमधील ब्लेझ डायग्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर 78 जणांना घेऊन जाणारे हे बोईंग 737 विमान अचानक धावपट्टीवरून घसरले.

Boeing 737 Crashes Off Runway

Plane Crashes Off A Runway: गुरुवारी सेनेगलमध्ये एक मोठा विमान अपघात घडला. या ठिकाणी बोइंग 737 विमान धावपट्टीवरून कोसळले. प्राथमिक अहवालानुसार यामध्ये किमान 11 जण जखमी झाले आहेत. सेनेगलमधील ब्लेझ डायग्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर 78 जणांना घेऊन जाणारे हे बोईंग 737 विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. वृत्तानुसार, टेक ऑफच्या वेळी हायड्रोलिक समस्येमुळे विमानाचा डावा पंख आणि इंजिनला आग लागली. यामध्ये पायलटसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातामुळे पश्चिम आफ्रिकन विमानतळावरील सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. (हेही वाचा: Israel Gaza War: इस्रायली सैन्याचा रफाहवर हल्ला, 20 जण ठार)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)