Paris Shocker: आयफेल टॉवरखाली चाकूचा धाक दाखवून 23 वर्षीय ब्रिटीश पोलीस महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

या 23 वर्षीय महिलेने फ्रेंच पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चॅम्प-डी-मार्स येथे या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल केला.

arrest

सोमवारी पॅरिसमधील आयफेल टॉवरखाली चाकूचा धाक दाखवून एका ब्रिटीश महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही महिला एक पर्यटक होती जी एका मित्रासोबत दोन दिवसांसाठी  पॅरिसला आली होती. ही महिला शौचास जाण्यासाठी झुडुपामागे गेली असता असताना अचानक एका हल्लेखोराने तिला लक्ष्य केले. या 23 वर्षीय महिलेने फ्रेंच पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चॅम्प-डी-मार्स येथे या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने तात्काळ आपत्कालीन सेवांना कॉल केला. ताबडतोब अग्निशमन दलाचे जवान आणि गुन्हे विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. (हेही वाचा: Gujarat Shocker: इंस्टाग्रामवरील मित्राने न्यूड व्हिडिओद्वारे 13 वर्षीय मुलीला केले ब्लॅकमेल, 70,000 रुपयेही उकळले; पोलिसांकडून अटक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now