Norway Floods: नॉर्वेमध्ये भीषण पूरस्थिती; नदीत वाहून गेले संपूर्ण मोबाईल घर (Watch)

नॉर्वेच्या हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या तीव्र हवामानामुळे उद्भवलेल्या संकटातून लवकर सुटका मिळण्याची आशा नाही.

Norway Floods

सध्या युरोपातील अनेक भाग नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहेत. हंस वादळामुळे अनेक देशांना मुसळधार पाऊस आणि पुराचा फटका बसत आहे. सोमवारी जोरदार वारा, पाऊस आणि गडगडाटी वादळांमुळे अनेक इमारती आणि वाहनांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. पूर आणि भूस्खलनामुळे मंगळवारी नॉर्वेमधील अनेक रस्ते बंद राहिले. नॉर्वेच्या हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या तीव्र हवामानामुळे उद्भवलेल्या संकटातून लवकर सुटका मिळण्याची आशा नाही. अशात नॉर्वेमधील पुराच्या वेळी एक संपूर्ण मोबाईल घर वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक घर नदीच्या पाण्यात वाहून जात आहे. पुलावरील काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला. (हेही वाचा: Portugal Wildfire: पोर्तुगालमध्ये जंगलात आग, 1,400 लोकांचे स्थलांतर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement