New Tesla CFO: टेस्लाने केली भारतीय वंशाच्या Vaibhav Taneja यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती
यापूर्वी वैभव हे लेखा विभागाचे प्रमुख होते.
सध्या मायक्रोसॉफ्टपासून गुगलपर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांची जबाबदारी भारतीय वंशाचे अधिकारी सांभाळत आहेत. अशात आता जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या टेस्लाने भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा यांना टेस्लाचे सीएफओ झाचेरी किर्खॉर्न यांच्या जागी ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी वैभव हे लेखा विभागाचे प्रमुख होते. टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील. वैभव टेस्लासोबत 2016 पासून काम करत आहेत. वैभव यांना जानेवारी 2021 मध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बनवण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)