Kim Jong Un Ask Women To Have More Children: हुकुमशाह किम जोंग उनला उत्तर कोरियातील घटत्या जन्मदराबाबत चिंता; महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाचा अंदाज आहे की उत्तर कोरियाचा प्रजनन दर सतत घसरत आहे. अलिकडच्या दशकांतील तो नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.
उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा नेता किम जोंग उन (Kim Jong Un) देशातील घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहे. या विषयावर त्याने राजधानी प्योंगयांगमध्ये मातांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी किम जोंग याने उत्तर कोरियाच्या मातांना घटत्या जन्मदराशी निगडित सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तो म्हणाला की, घर चालवणाऱ्या प्रत्येक महिलेला या आव्हानाला सामोरे जावे लागते. जन्मदरातील घसरण रोखणे आणि मुलांची चांगली काळजी घेणे ही सर्व मातांची कर्तव्ये आहेत, जी आपण काम करत असताना देखील हाताळली पाहिजेत. यावेळी त्याने देशातील ‘राष्ट्रीय शक्ती मजबूत’ करण्यासाठी महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. गेल्या 11 वर्षातील देशातील ही पहिली अशी मातांची बैठक होती.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडाचा अंदाज आहे की उत्तर कोरियाचा प्रजनन दर सतत घसरत आहे. अलिकडच्या दशकांतील तो नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 2023 पर्यंत, उत्तर कोरियामध्ये एका महिलेला जन्मलेल्या मुलांची सरासरी संख्या 1.8 होती. घटत्या प्रजनन दराशी झगडणाऱ्या देशांमध्ये चीन, जपान आणि दक्षिण कोरिया हे प्रमुख आहेत. (हेही वाचा: Macau Tower Horror: मकाऊ टॉवरवरून 233 मीटर बंजी जंप पूर्ण केल्यानंतर जपानी पर्यटकाचा मृत्यू: Reports)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)