Macau Tower Horror: मकाऊ टॉवरवरून 233 मीटर बंजी जंप पूर्ण केल्यानंतर जपानी पर्यटकाचा मृत्यू: Reports
रविवारी (डिसेंबर 3) मकाऊ टॉवरवरून बंजी जंप पूर्ण केल्यानंतर 56 वर्षीय जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला.
Tourist Died After Bungee Jump: जगातील सर्वात उंच बंजी जंप (Bungee Jump) समजल्या जाणाऱ्या चीनच्या मकाऊ टॉवरवर (Macau Tower) एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी उडी घेतल्यानंतर एका जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी (डिसेंबर 3) मकाऊ टॉवरवरून बंजी जंप पूर्ण केल्यानंतर 56 वर्षीय जपानी पर्यटकाचा मृत्यू झाला. हाँगकाँगच्या HK01 या वृत्त साईटने सांगितले की, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास 233 मीटरवरून उडी मारल्यानंतर या व्यक्तीला दम लागला. त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ लागली. नंतर त्याला कोंडे एस जनुरियो रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या ठिकाणी AJ Hacket कडून Skypark द्वारे बंजी जंप व इतर साहसी गीश्ती चालवल्या जातात. 2006 मध्ये पहिल्यांदा लोकांसाठी उघडलेले मकाऊ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक बंजी जंप आहे. (हेही वाचा: France Plane Crash: कॅरिबियन येथील टेरे दे हौते बेटावर विमान कोसळलं, अपघातात पाच जणांचा मृत्यू)
Tourist dies after leaping from world’s second-highest bungee jump https://t.co/xZvuQjsvUe pic.twitter.com/vIxX8pL6eq
— New York Post (@nypost) December 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2023 09:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

