Kenya Protest: केनियामध्ये वादग्रस्त वित्त विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने; आंदोलकांनी संसदेला लावली आग (Watch Video)

सोमवारीही सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये अनेक वेळा चकमक झाली होती. या संघर्षात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या आंदोलनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची बहीण औमा ओबामाही सहभागी झाल्या होत्या.

Kenya Protest

Kenya Protest: केनियामध्ये वादग्रस्त वित्त विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. देशात करवाढ करणाऱ्या फायनान्स बिलाच्या निषेधार्थ निदर्शकांनी मंगळवारी संसदेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी इमारतीमध्ये गोंधळ घातला. संसदेचा काही भागही जाळण्यात आला. विरोधकांचा संताप पाहून खासदारांनी सभागृह सोडून पळ काढला.या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये आंदोलक पोलिसांवर दबाव आणून संसदेत घुसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

याआधी सोमवारीही सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये अनेक वेळा चकमक झाली होती. या संघर्षात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या आंदोलनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची बहीण औमा ओबामाही सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. केनिया सरकारने ब्रेडवर 16 टक्के आणि मोटार वाहनांवर 2.5 टक्के व्हॅट लावला आहे. हे विधेयक संसदेत मांडण्यात आल्याची बातमी कळताच केनियातील लोक मंगळवारी संतप्त झाले. यानंतर आंदोलक अचानक अनियंत्रित झाले आणि संसदेत घुसले. (हेही वाचा: Trash Balloons War: उत्तर कोरियाने अधिक कचरा भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने पाठवले; 350 फुगे असल्याचा सैन्याचा दावा)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now