Joe Biden India Tour: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारताच्या दौऱ्यावर; G-20 शिखर परिषदेत होणार सहभागी
त्यानंतर देशात विविध विषयांवर अनेक बैठका झाल्या.
भारत सध्या G20 देशांचे अध्यक्षपद भूषवत आहे. अशात सप्टेंबरमध्ये भारताच्या यजमानपदाच्या अंतर्गत जी-20 शिखर परिषद आयोजित केली जाईल. यात अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. आता या जी-20 परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष बिडेन 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. बिडेन यांच्या भेटीदरम्यान, जागतिक आव्हानांचा सामना करण्यासह गरिबीशी अधिक चांगल्या प्रकारे लढा देण्यासाठी जागतिक बँकेसह बहुपक्षीय विकास बँकांची क्षमता वाढविण्यावर चर्चा केली जाईल. भारताला गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी जी-20 चे अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर देशात विविध विषयांवर अनेक बैठका झाल्या. मे महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन हे देखील जी-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आले होते. (हेही वाचा: G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार शाळा, सरकारी कार्यालयं)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)