IPL Auction 2025 Live

Jacket With PM Modi Image Video: यूएसमधील भारतीय डायस्पोरा सदस्य Minesh C Patel यांनी परिधान केले पीएम नरेंद्र मोदींचे फोटो छापलेले खास जॅकेट (Watch)

या भेटीदरम्यान पंतप्रधान टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क आणि इतर उद्योगपतींची भेट घेणार आहेत.

Jacket With PM Modi Image Video

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेमध्ये आगमन झाले आहे. पीएम मोदींच्या युनायटेड स्टेट्सच्या आगमनापूर्वी, भारतीय डायस्पोरा सदस्य मिनेश सी पटेल एक खास जॅकेट फ्लॉंट करताना दिसले, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे आहेत. आपल्या अनोख्या जॅकेटबद्दल पटेल म्हणाले, 'हे जॅकेट 2015 मध्ये गुजरात दिनादरम्यान बनवले गेले होते. आमच्याकडे अशी 26 जॅकेट आहेत आणि 26 (जॅकेट) पैकी चार आज येथे आहेत.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या अधिकृत अमेरिका दौऱ्याचा एक भाग म्हणून न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क आणि इतर उद्योगपतींची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या अजेंड्यामध्ये अनेक अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ञ यांच्या भेटींचाही समावेश आहे. भारताच्या पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. मोदीजी बुधवारी योग दिनानिमित्त न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवाचा भाग असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या भेटीचीही सर्वांना प्रतीक्षा आहे. दोन्ही देशांमधील या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत अमेरिकेसोबत संरक्षण क्षेत्रात मोठा करार करणार आहे. (हेही वाचा: Mumbai-Goa 'Vande Bharat Express': खुशखबर! 27 जूनपासून धावणार मुंबई-गोवा 'वंदे भारत एक्स्प्रेस'; PM Modi एकाच वेळी पाच गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)