Iraq Fire: कुर्दिस्तान प्रांतात विद्यापीठाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू, आग विझवण्याचे काम सुरु
इराक मधील उत्तरेकडील एरबिल शहराजवळ सोरान नाव असलेल्या विद्यापीठाच्या वसतिगृहात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Iraq Fire: इराक मधील उत्तरेकडील एरबिल शहराजवळ सोरान नाव असलेल्या विद्यापीठाच्या वसतिगृहात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीत किमान 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. तर या घटनेत आणखी 18 लोक जखमी झाले. आगीची माहिती मिळताच, यंत्रणा सज्ज झाली. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सोरान युनिव्हर्सिटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागलेली ही आग यशस्वीरित्या नियंत्रणात आणण्यात आली आहे. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. ही आग 'इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement