'इंस्टाग्राम लोकांना उदास बनवते, तर ट्विटरमुळे लोकांना राग येतो'- Elon Musk

मस्कच्या अनेक फॉलोअर्सनी सांगितले की, ट्विटरमुळे त्यांना राग येत नाही, तर ट्वीटरमुळे दिवसभर त्यांचे मनोरंजन होते.

Elon Musk (Credit- ANI)

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे मुख्य कार्यकारी इलॉन मस्क म्हणतात की, सोशल मीडिया साइट इन्स्टाग्राममुळे वापरकर्त्यांना नैराश्य येते, तसेच ट्विटरमुळे लोकांना संताप येतो असेही ते म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी ट्विटरवर युजर्सना विचारले की, ‘लोक इंस्टाग्राममुळे उदास होत आहेत, ट्विटरमुळे त्यांना राग येत आहे, तर या दोन्हीपैकी कोणते चांगले आहे?’ या प्रश्नानंतर ट्विटरवर कमेंट्सचा ओघ सुरु आहे. मस्कच्या अनेक फॉलोअर्सनी सांगितले की, ट्विटरमुळे त्यांना राग येत नाही, तर ट्वीटरमुळे दिवसभर त्यांचे मनोरंजन होते. अजून एका युजरने सांगितले की, लिंक्डइनमुळे लोकांना नैराश्या येत आहे, तर दुसरीकडे, इन्स्टाग्रामचा वापर लोक स्वतःचे जीवन परिपूर्ण करण्यासाठी करत आहेत.