सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या प्रियकराला सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा; माजी प्रेयसीच्या मंगेतराच्या फ्लॅटसमोर लावली आग

सुरेंथिरन सुगुमारन असे त्याचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये आपला गुन्हा कबूल केला.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या प्रियकराला न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. वृत्तानुसार, या भारतीय वंशाच्या तरुणाने सिंगापूरमध्ये आपल्या माजी प्रेयसीच्या मंगेतराच्या फ्लॅटसमोर आग लावली. या प्रकरणी त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेंथिरन सुगुमारन असे त्याचे नाव असून तो 30 वर्षांचा आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये आपला गुन्हा कबूल केला. सुरेंथिरनला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कळले की त्याची माजी प्रेयसी मोहम्मद अजली मोहम्मद सल्लेहशी लग्न करत आहे. यानंतर सुगुमरणने संतापाच्या भरात 12 मार्च रोजी मोहम्मद अजली मोहम्मद सल्लेह याच्या 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लावली. सल्लेहने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता सुगुमारनला महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement