भारतीय-अमेरिकन अल्पसंख्याक समुदायाने न्यूयॉर्कमध्ये साजरा केला PM Narendra Modi यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा आनंद (Watch Video)

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी हातात तिरंगा धरून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा केला.

टाईम्स स्क्वेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. याबाबत अजूनही जगभरातील भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आता भारतीय-अमेरिकन अल्पसंख्याक समुदायाने न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींचा तिसरा कार्यकाळ साजरा केला. इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशन (IMF) आणि द युनिटी ऑफ फेथ्स फाऊंडेशन, भारत (TUFF India) यांनी याबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी हातात तिरंगा धरून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी 'भारत माता की जय' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या. टाइम्स स्क्वेअर येथील ग्लोबल सिक्युरिटी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जोनाथन ग्रॅनॉफ देखील मोदी 3.0 च्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले होते. (हेही वाचा: Russia's Highest Civilian Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाल रशियाचा सर्वोच्च सन्मान, PM Modi म्हणाले, 'हे दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक आहे')

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement