Imran Khan Arrest: इम्रान खानच्या अटकेनंतर PM Shahbaz Sharif यांचे देशाला संबोधन, म्हणाले- 'आम्ही सूडाचे राजकारण करत नाही'
हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. परिस्थिती बिघडत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशाला संबोधित केले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) इम्रान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण देशातील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये लोकांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. परिस्थिती बिघडत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशाला संबोधित केले.
ते आपल्या भाषणात म्हणाले की, ‘इम्रान सत्तेत असताना केवळ आरोपांवरून अटक करण्यात आली होती. आम्ही सूडाचे राजकारण करत नाही. आमच्याविरुद्धही अनेक NAB प्रकरणे आहेत, परंतु त्यापैकी एकही आमच्याविरुद्ध अद्याप सिद्ध झालेला नाही. आम्ही कायद्याला सामोरे जाण्यास नकार दिला नाही. आम्ही नेहमीच न्यायालयात हजर राहिलो. पण इम्रान खानच्या वेळी तसा चेहरा दिसत नव्हता. ते पुढे म्हणाले की, इम्रानला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्यांनी 60 अब्ज रुपयांचा घोटाळा केला.’ ते पुढे म्हणाले, ‘सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे म्हणजे दहशतवाद.’ (हेही वाचा: Imran Khan In NAB Custody: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना 8 दिवसांची एनएबी कोठडी, PTI पक्षासाठी मोठा धक्का)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)