Groom Died After Wedding: अमेरिकेतील नेब्रास्का येथे लग्नानंतर एका तासात वराचा मृत्यू; लग्न समारंभाच नववधू झाली विधवा
वधूच्या मित्रांनी सांगितले की, लग्न समारंभ सुरू झाल्यानंतर एक तासानंतर टॉरेझ डेव्हिसचे हृदय थांबले. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला.
अमेरिकेतील नेब्रास्का येथील एका वराचा विवाह समारंभानंतर अवघ्या तासाभरात मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वधूच्या मित्रांनी याबाबत माहिती दिली. टॉरेझ डेव्हिस असे वराचे नाव असून, जॉनी मे डेव्हिस वधूचे नाव आहे. आपली मुले, आपले पालक, कुटुंब आणि मित्रांसमोर टॉरेझ आणि जॉनी मे यांनी उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत व्यतीत करण्याचे वचन दिले. त्यानंतर थोड्याच वेळात, अचानक टॉरेझ खाली पडला. आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली व त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे आयुष्यभराचा उत्सव एका शोकांतिकेमध्ये बदलला. अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत $12,000 पेक्षा जास्त रक्कम जमा केली. ज्या वधूने तिच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली होती, तिच्यावर लग्नानंतर अवघ्या काही काळानंतर पतीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
वधूच्या मित्रांनी सांगितले की, लग्न समारंभ सुरू झाल्यानंतर एक तासानंतर टॉरेझ डेव्हिसचे हृदय थांबले. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार, टॉरेझ डेव्हिसचा अंत्यसंस्कार 5 जुलै रोजी होईल. (हेही वाचा: US Woman Shoots Uber Driver: अपहरण समजून महिलेने उबेर चालकावर झाडल्या गोळ्या, हत्येचा गुन्हा दाखल)
Groom Died After Wedding-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)