Global Sextortion: पाकिस्तानी युट्युबरने 20 देशांतील 286 मुलींचे केले लैंगिक शोषण; ऑस्ट्रेलियन कोर्टाने सुनावली 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

त्याच्या बळींपैकी दोन तृतीयांश 16 वर्षाखालील होते.

प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Global Sextortion: आधुनिक जगात आपण आपले जीवन सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो, मात्र कधी-कधी याच तंत्रज्ञानाचा फायदा घेत काही लोक गुन्हेगारीचा मार्ग अवलंबतात. नुकतीच घडलेली घटना ऑस्ट्रेलियातील आहे, जी वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. अलीकडेच ऑस्ट्रेलियन कोर्टाने पाकिस्तानी वंशाच्या मुहम्मद झैन उल अबेदिन रशीदला (Muhammad Zain Ul Abideen Rasheed) 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रशीदवर जगभरातील शेकडो मुलींना कॅमेऱ्यावर लैंगिक कृत्ये करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. एक प्रसिद्ध यूट्यूबर असल्याचे भासवून रशीद मुलींना जाळ्यात ओढायचा.

ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्यामते ही घटना देशाच्या इतिहासातील ‘सर्वात वाईट लैंगिक अत्याचार प्रकरणांपैकी एक’ आहे. या प्रकरणी 2020 मध्ये त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले. मंगळवारी न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. पर्थ पार्कमध्ये आपल्या कारमध्ये 14 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल रशीद आधीच पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. (हेही वाचा: Gang Rape in Jodhpur: जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक, तपास सुरु)

पाकिस्तानी युट्युबरने 20 देशांतील 286 मुलींचे केले लैंगिक शोषण-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)