Germany Links Citizenship To Loyalty For Israel: जर्मन नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्जदारांनी इस्रायलचे समर्थन करणे आवश्यक; गृह मंत्रालयाचे आदेश- Reports

जर्मन नागरिकत्व घेणाऱ्या अर्जदारांना, ते इस्रायल राज्याचे समर्थन करतात असे लिखित स्वरूपात द्यावे लागेल.

जर्मनी व इस्रायल झेंडा (संग्रहित संपादित प्रतिमा)

Germany Links Citizenship To Loyalty For Israel: जर्मनी-इस्रायल संबंध हे फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी आणि इस्रायल राज्य यांच्यातील राजनैतिक संबंध आहेत. आता जर्मन नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या कोणीही इस्राएलच्या अस्तित्वाच्या हक्काला त्यांचे समर्थन जाहीर करणे गरजेचे आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने असे आदेश जारी केले आहेत. गेल्या महिन्यात जिल्हे आणि स्वतंत्र शहरांना जारी करण्यात आलेल्या निर्देशात दावा केला होता की, इस्रायलचा अस्तित्वाचा हक्क जर्मनीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर्मन नागरिकत्व मिळविण्यासाठी इस्रायलच्या अस्तित्वाच्या अधिकारासाठी वचनबद्धता आवश्यक आहे.

जर्मन नागरिकत्व घेणाऱ्या अर्जदारांना, ते इस्रायल राज्याचे समर्थन करतात असे लिखित स्वरूपात द्यावे लागेल. तसेच अर्जदारांना हे देखील लिखित स्वरूपात द्यावे लागेल की, ते इस्रायल राज्याच्या विरोधात निर्देशित केलेल्या कोणत्याही प्रयत्नांचा निषेध करतात. (हेही वाचा: Israel Hamas War: गाझामध्ये मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 18,400 पेक्षा जास्त)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now