Donald Trump Signs Women Top: डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलेच्या छातीवर दिला आपला ऑटोग्राफ; अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा VIDEO व्हायरल (Watch)

नुकतेच आयव्हच्या (Iowa) बेटेनडॉर्फ येथील प्रचाराच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेवर जोरदार छाप पाडली.

Donald Trump Signs Women Top

पुढच्या वर्षी अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशात माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. नुकतेच आयव्हच्या (Iowa) बेटेनडॉर्फ येथील प्रचाराच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनतेवर जोरदार छाप पाडली. कॅथीज ट्रीहाऊस पब-इटरी या ठिकाणी ट्रंप यांना भेटण्यासाठी शेकडो लोक जमले होते. सध्या या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रंप चक्क एका महिलेच्या टँक टॉपवर आपला ऑटोग्राफ देताना दिसत आहेत. या 28 वर्षीय महिलेचे नाव अॅशले रशीद असून ती इथली बारटेंडर आहे. ट्रंप यांनी डॉलर बिल आणि कॅप्सवरही आपला ऑटोग्राफ दिला. तसेच या ठिकाणी त्यांनी पिझ्झाचे वाटप केले. (हेही वाचा: Stairway To Heaven: ऑस्ट्रियामध्ये 'स्टेअरवे टू हेवन' चढताना ब्रिटीश पर्यटकाचा मृत्यू)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement