Canary Islands Boat Accident: स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

या डिंगीमध्ये एकूण 59 लोक होते, जे कॅनरी बेटांकडे जात होते. वाटेत ही डिंगी बुडाली.

Drowning | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातून अनेक बोट अपघाताच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आताही स्पेनमधून अशीच एक घटना समोर येत आहे. स्पॅनिश स्वायत्त समुदाय असलेल्या कॅनरी बेटांवर जाणाऱ्या डिंगीवरील किमान 35 स्थलांतरीत लोक बुडाले असल्याची माहिती मिळत आहे. डिंगी ही एक प्रकारची छोटी बोट असते, जिला अनेकदा मोठ्या जहाजाने वाहून नेले जाते.

स्थलांतर-केंद्रित संस्था वॉकिंग बॉर्डर्स आणि अलार्म फोनने बुधवारी सांगितले की, या डिंगीमध्ये एकूण 59 लोक होते, जे कॅनरी बेटांकडे जात होते. वाटेत ही डिंगी बुडाली. स्पॅनिश सागरी बचाव सेवेतील एका स्त्रोताने सांगितले की, ग्रॅन कॅनरियाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 88 मैलांवर मोरोक्कन-नेतृत्वाखाली केलेल्या ऑपरेशनमध्ये 24 लोकांना या बुडत्या डिंगीतून वाचवण्यात आले. (हेही वाचा: Greece Boat Tragedy: ग्रीसमध्ये शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; 300 पाकिस्तानी लोकांच्या मृत्यूची भीती, पीएम शाहबाज शरीफ यांनी घोषित केला राष्ट्रीय शोक)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement