India To Become $10 Trillion Economy: 2047 पर्यंत भारत अमेरिकेनंतरची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; WEF चे अध्यक्ष Borge Brende यांची भविष्यवाणी

भारत येत्या काही वर्षांत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे (WEF President Borge Brende) यांनी म्हटलं आहे.

WEF President Borge Brende (PC - X/PTI)

India To Become $10 Trillion Economy: भारताची अर्थव्यवस्था वेगवाग गतीने विकसित होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. कारण, आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे (WEF President Borge Brende) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल भविष्यवाणी केली आहे. बोर्गे ब्रेंडे यांना भारताच्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की, '2047 पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि विकसित राष्ट्र बनेल. भारत येत्या काही वर्षांत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. भारताने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. भारताची स्थिती चांगली आहे आणि मला वाटते, भारत अमेरिका आणि चीननंतरची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल.' (Tata Group's Market Value Higher Than Pakistan's GDP: संपूर्ण पाकिस्तानावर टाटा ग्रूप भरला भारी; टाटा समूहाचे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त)

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)