Boeing 757-200 Makes Emergency Landing: उड्डाणानंतर बोइंग 757-200 विमानाचा एक पंख तुटला; करावे लागले आपत्कालीन लँडिंग, पहा व्हिडिओ (Watch)

विमानातील 165 प्रवाश्यांपैकी एक केविन क्लार्कने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्लेटचे फलक अर्धवट तुटलेले दिसत आहे.

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

Boeing 757-200 Makes Emergency Landing: सॅन फ्रान्सिस्कोहून बोस्टनला जाणाऱ्या फ्लाइट 354 चा एक पंख खराब झाल्याने विमानाचे सोमवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. युनायटेड एअरलाइन्सने मंगळवारी याची पुष्टी केली. कंपनीने सांगितले की, हे बोईंग 757-200 विमान होते. विमानाच्या पंखावरील स्लॅटमध्ये समस्या उभावली होती. मात्र त्याचा एक पंख नक्की कसा खराब झाले याचे कारण निर्दिष्ट केले नाही. विमानातील 165 प्रवाश्यांपैकी एक केविन क्लार्कने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्लेटचे फलक अर्धवट तुटलेले दिसत आहे. विंग फ्लॅपच्या समस्येनंतर विमान डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले आणि संध्याकाळी 5:21 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले. युनायटेड एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना त्यानंतर दुसऱ्या विमानात हलवण्यात आले आणि मंगळवारी सकाळी ते बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आता फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने मंगळवारी सांगितले की, ते युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग 757-200 विमानाची समस्या आणि आपत्कालीन लँडिंगची चौकशी करत आहेत. (हेही वाचा: New Species of Anaconda: ग्रीन ॲनाकोंडा, ॲमेझॉनच्या जंगलात आढळली जगातील सर्वात मोठ्या सापाची प्रजाती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

International Noise Awareness Day 2025: उद्या साजरा होणार आंतरराष्ट्रीय ध्वनी जागरूकता दिन; जाणून घ्या आरोग्य, मानसिक शांती आणि जीवनमानासाठी आवश्यक असणाऱ्या या दिवसाचे महत्व व इतिहास

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 1 जून रोजी PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार; ऑगस्टपर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता- Reports

Pune Metro Update: पुण्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार, MoS Murlidhar Mohol यांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश

Bangladesh vs Zimbabwe 2nd Test Match Live Streaming In India: झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला हरवून मालिका जिंकण्याचा प्रयत्नात; जाणून घ्या भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement