Bird-Like Military Drones: चीनी सैन्याने जिआंगशीमध्ये लॉन्च केले पक्ष्यांसारखे दिसणारे लष्करी ड्रोन; हेरगिरीसाठी वापरले जाणार, व्हिडिओ व्हायरल (Watch)
हे पीएलएच्या मरीन कॉर्प्सचा भाग आहेत. कमांडो हा चिमणी किंवा कबुतराच्या आकाराचा पक्षी ड्रोन लॉन्च करत आहेत.
Bird-Like Military Drones: जवळजवळ 20 लाखांहून अधिक सैनिकांसह, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आज जगातील सर्वात मोठी सेना आहे. ड्रॅगनने 2018 पासून सैन्य भरतीमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनकडे एकूण 3304 विमाने आहेत. यातील एकूण 1207 लढाऊ विमाने आणि 371 हल्ला विमाने आहेत. चीनकडे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी विविध प्रकाराचे अनेक ड्रोनदेखील आहेत. आता माहिती मिळत आहे की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कथितपणे पक्ष्यांसारखे दिसणारे ड्रोन वापरते. याच्रे एक नवीन फुटेज समोर आले आहे. हे ड्रोन वरवर पाहता दूरवरून कबुतरांसारखे दिसते, व ते हेरगिरीसाठी तयार केले आहे. हे ड्रोन चीनच्या 2018 कबूतर कार्यक्रमाचा भाग आहेत. हे ड्रोन उडताना पक्ष्यांसारखे आपले पंखही फडकवू शकतात.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पीएलएचे जिओलाँग कमांडो हा पक्षी ड्रोन वापरताना दिसत आहेत. हे पीएलएच्या मरीन कॉर्प्सचा भाग आहेत. कमांडो हा चिमणी किंवा कबुतराच्या आकाराचा पक्षी ड्रोन लॉन्च करत आहेत. (हेही वाचा; Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI व चीनचा हात? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)