Bird-Like Military Drones: चीनी सैन्याने जिआंगशीमध्ये लॉन्च केले पक्ष्यांसारखे दिसणारे लष्करी ड्रोन; हेरगिरीसाठी वापरले जाणार, व्हिडिओ व्हायरल (Watch)

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पीएलएचे जिओलाँग कमांडो हा पक्षी ड्रोन वापरताना दिसत आहेत. हे पीएलएच्या मरीन कॉर्प्सचा भाग आहेत. कमांडो हा चिमणी किंवा कबुतराच्या आकाराचा पक्षी ड्रोन लॉन्च करत आहेत.

Bird-Like Military Drones: चीनी सैन्याने जिआंगशीमध्ये लॉन्च केले पक्ष्यांसारखे दिसणारे लष्करी ड्रोन; हेरगिरीसाठी वापरले जाणार, व्हिडिओ व्हायरल (Watch)
Bird-Like Military Drones

Bird-Like Military Drones: जवळजवळ 20 लाखांहून अधिक सैनिकांसह, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आज जगातील सर्वात मोठी सेना आहे. ड्रॅगनने 2018 पासून सैन्य भरतीमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनकडे एकूण 3304 विमाने आहेत. यातील एकूण 1207 लढाऊ विमाने आणि 371 हल्ला विमाने आहेत. चीनकडे शत्रूवर नजर ठेवण्यासाठी विविध प्रकाराचे अनेक ड्रोनदेखील आहेत. आता माहिती मिळत आहे की, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कथितपणे पक्ष्यांसारखे दिसणारे ड्रोन वापरते. याच्रे एक नवीन फुटेज समोर आले आहे. हे ड्रोन वरवर पाहता दूरवरून कबुतरांसारखे दिसते, व ते हेरगिरीसाठी तयार केले आहे. हे ड्रोन चीनच्या 2018 कबूतर कार्यक्रमाचा भाग आहेत. हे ड्रोन उडताना पक्ष्यांसारखे आपले पंखही फडकवू शकतात.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पीएलएचे जिओलाँग कमांडो हा पक्षी ड्रोन वापरताना दिसत आहेत. हे पीएलएच्या मरीन कॉर्प्सचा भाग आहेत. कमांडो हा चिमणी किंवा कबुतराच्या आकाराचा पक्षी ड्रोन लॉन्च करत आहेत. (हेही वाचा; Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचारामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI व चीनचा हात? अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

पहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).