Anju's Viral Video: अंजू ऊर्फ फातिमा नसरुल्लासोबत बुरख्यात डिनर करताना, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल (Watch Video)

भारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने तिचा ऑनलाईन मित्र नसरुल्लाहसोबत लग्न केले आहे. सद्या सोशल मीडियावर दोघांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Anju And narshulla Viral video PC Twitter

Anju's Viral Video: सद्या सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिन या दोघांची लवस्टोरी फेमस होत आहे. पाकिस्तानी विवाहीत महिला आपल्या पतीला सोडून भारतीय प्रियकरांकडे चार मुलासह आली. दरम्यान ही बातमी ताजी असताना भारतीय अंजू जी राजस्थान येथे कुटूंबा सोबत राहायची तीनं देखील  आपल्या पतीला सोडून फेसबुक झालेल्या पाकिस्तानी प्रियकराकडे आली. अंजूने पाकिस्तानी नसरुल्लासोबत लग्न केलं. पाकिस्तानात सह भारतातही या दोघांच्या लवस्टोरीची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर दोघांचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान अंजूचा नसरुल्लासोबत बुरख्यात डिनर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकरत नसरुल्लासोबत लग्न केलं. दोघांनी प्री वेडींग शुट केल तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंजूने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. तिचे नवीन इस्लामिक नाव फातिमा असे असेल. ते दोघेही मित्र परिवारा सोबत डिनर करताना दिसत आहे. अंजू ऊर्फ फातिमा यावेळी बुरख्यात  दिसली आहे. व्हिडिओ पाहून युजर्सने यावर कंमेट देखील केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement