Angry CEO Fires 99 Employees: सकाळच्या मीटिंगला आले नाहीत 99 लोक, चिडलेल्या सीईओने सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले- Reports

एका इंटर्नने सोशल मीडियावर याबाबतचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आणि सांगितले की त्याला एका म्युझिक इन्स्ट्रुमेंट कंपनीत इंटर्न म्हणून कामावर घेण्यात आले होते, पण जॉइन केल्याच्या तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आले.

Angry CEO Fires 99 Employees: सकाळच्या मीटिंगला आले नाहीत 99 लोक, चिडलेल्या सीईओने सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले- Reports
Layoffs, Fired, Job Cuts Representational Image (Photo Credits: Pexels)

यूएस-आधारित कंपनीच्या सीईओने आपल्या 111 पैकी 99 कर्मचाऱ्यांना ते मिटींग्जसाठी उपस्थित राहिले नसल्याने त्यांना कामावरून काढून टाकले आहे. एका इंटर्नने सोशल मीडियावर याबाबतचा एक स्क्रीन शॉट शेअर केला आणि सांगितले की त्याला एका म्युझिक इन्स्ट्रुमेंट कंपनीत इंटर्न म्हणून कामावर घेण्यात आले होते, पण जॉइन केल्याच्या तासाभरातच त्याला काढून टाकण्यात आले. सीईओने सांगितले की, तुम्ही कामावर घेण्याच्या वेळी मान्य केलेल्या धोरणाची पूर्तता केली नाही. त्यामुळे केवळ मीटिंगला उपस्थित राहिलेल्या लोकांनाच कंपनीमध्ये ठेवले जाईल, इतर लोकांना काढून टाकले जात आहे. सीईओने कर्मचाऱ्यांना कंपनीकडून जे काही घेतले आहे ते परत करण्यास सांगितले आहे. रेडिटची ही पोस्ट व्हायरल होताच कंपनीच्या सीईओने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बाल्डविन ओडसन असे या सीईओचे नाव असून त्याच्या लिंक्डइन पृष्ठावर एक नजर टाकल्यावर असे दिसून आले की तो 'द म्युझिशियन्स क्लब'चा संस्थापक आहे. (हेही वाचा: Tata Group to Create Jobs: टाटा समूहाने आखली 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देण्याची योजना; 'या' क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणार रोजगार, जाणून घ्या सविस्तर)

Angry CEO Fires 99 Employees:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2024 10:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).