Russia: रशियन सैन्याचे तीन हेलिकॉप्टर पाडल्याचा वॅग्नरचा दावा (Watch Video)

वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर लष्करावर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे

Russia-Ukraine War | (Photo Credit - Twitter)

रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीच निर्माण केलेल्या वॅग्नर या खासगी लष्कराने बंडखोरी केली आहे. वॅग्नर लष्कराने रशियाच्या दोन शहरांवर आपलं नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. याशिवाय वॅग्नरने रशियन सैन्याचे तीन हेलिकॉप्टर पाडल्याचाही दावा केला आहे. दरम्यान, वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर लष्करावर देशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now