WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये शेअर करू शकाल व्हॉइस रेकॉर्डिंग; कंपनी घेऊन येत आहे नवे फिचर, जाणून घ्या सविस्तर
व्हॉट्सअॅप स्टेटसच्या या नवीन अपडेटसह, वापरकर्ते आता त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग 30 सेकंदांपर्यंत शेअर करू शकतात.
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वेळोवेळी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. व्हॉट्सअॅपच्या अनेक ढासू फीचर्समुळे यूजर्स चॅटिंगचा अधिक आनंद घेऊ शकत आहेत. Whatsapp चे स्टेटस फीचरदेखील जगभरातील कोट्यावधी यूजर्स वापरतात. आता या फीचरमध्ये नवीन अपडेट आले आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या या नवीन अपडेटसह, वापरकर्ते आता त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग 30 सेकंदांपर्यंत शेअर करू शकतात. मेटा-मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने त्याच्या स्टेटसवर येणार्या नवीन फीचर्सची घोषणा केली, ज्यात 'व्हॉइस स्टेटस', 'स्टेटस रिअॅक्शन्स' आणि इतर अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. स्टेटसवर शेअर केलेली व्हॉइस नोट ऐकण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे व्हॉट्सअॅप नवीनतम व्हर्जनवर अपडेट करावे लागेल. स्टेटस अपडेट्स म्हणून शेअर केलेल्या व्हॉइस नोट्स या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.