UPI Now In France: परदेशात भारतीय डिजिटल पेमेंटचा डंका; फ्रान्समध्ये सुरु झाले युपीआय, बुक करू शकता Eiffel Tower ची तिकिटे
या उपक्रमाची सुरुवात आयफेल टॉवरपासून झाली आहे, जिथे भारतीय पर्यटक आता त्यांच्या युपीआय-समर्थित ॲप्सचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील.
UPI Now In France: भारतामधील एक लोकप्रिय व्यवहार प्रणाली युपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) हळूहळू जगाला भुरळ पडत चालली आहे. याआधी भारत आणि फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस संदर्भात करार झाला होता. आता माहिती मिळत आहे की, भारतामधील लोक युपीआयच्या मदतीने फ्रान्समध्ये पेमेंट करू शकतील. फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस पेमेंट मेकॅनिझम सुरू करण्यासाठी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) फ्रांसमधील ई-कॉमर्स आणि प्रॉक्सिमिटी पेमेंट्स सुरक्षित करणारी कंपनी Lyra सोबत हातमिळवणी केली आहे.
या उपक्रमाची सुरुवात आयफेल टॉवरपासून झाली आहे, जिथे भारतीय पर्यटक आता त्यांच्या युपीआय-समर्थित ॲप्सचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. भारतीय पर्यटकांना त्यांच्या युपीआय ॲप्सचा वापर करून वेबसाइटवरील क्यूआर कोड स्कॅन करून सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करू शकतात. आयफेल टॉवरला भेट देणाऱ्यांमध्ये भारत हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. लवकरच ही सेवा पर्यटन आणि किरकोळ उद्योगातील इतर व्यापाऱ्यांपर्यंत विस्तारली जाईल. यामुळे भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये राहण्यासाठी हॉटेल, संग्रहालय भेटी आणि इतर सेवा दूरस्थपणे बुक करणे अधिक सोपे होईल. (हेही वाचा: Kotak Mahindra Bank App Down: कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउन, वापरकर्ते चिंतेत)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)