Zuckerberg vs Musk: ट्वीटरच्या Elon Musk कडून Meta वर कायदेशीर कारवाईचे संकेत

मेटा कडून कालच थ्रेड्स हे नवं अ‍ॅप लॉन्च करण्यात आलं आहे. त्यामध्ये ट्वीटर प्रमाणे मनातील भावना, विचार व्यक्त करता येणार आहे.

Mark Zuckerberg , Elon Musk Wikimedia Commons

Twitter सारखच थ्रेड्स अ‍ॅप Mark Zuckerberg ने लॉन्च केल्यानंतर आता त्याला यावरून कायदेशीर लढाईला सामोरं जाव लागण्याची चिन्हं दिसत आहेत. Semafor च्या प्राथमिक रिपोर्ट्सनुसार, ट्वीटरच्या एलन मस्कने दावा केला आहे की मेटाने जुन्या ट्वीटर टीमला सोबतीला घेऊन नव्या प्लॅटफॉर्मची तयारी केली आहे. Twitter's lawyer, Alex Spiro यांनी Meta CEO Mark Zuckerberg यांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये अवैधरितीने ट्वीटरच्या trade secrets आणि intellectual property वर डल्ला मारल्याचा आरोप आहे. थ्रेड लॉन्च होताच 24 तासात त्याचे युजर्स 30 मिलियन पार गेले आहेत. नक्की वाचा: Threads App Launched: Meta ने लॉन्च केलं Twitter विरूद्ध Threads App; युजर्स Instagram Accounts वरूनही करू शकणार लॉग इन .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now